संजय जाधव यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट प्यार वाली लव्ह स्टोरीचे संगीताचे प्रकाशन
Pyaar-Vali-Love-Story-bollywood-update


सणासुदीचे दिवस जवळ येत असून या माहोलमध्ये प्यार वाली लव्ह स्टोरीचे (पीव्हीएलएस) संगीत रंग भरणार आहे. बहुप्रतिक्षित चित्रपट प्यार वाली लव्ह स्टोरीचे संगीत नुकतेच प्रसिध्द करण्यात आले. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. 24 ऑक्टोबर 2014 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सुप्रसिध्द सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक आणि लेखक संजय जाधव ड्रिमिंग ट्वेंटी फोर सेव्हन24X7, सिनेमा कंपनी इंडियाआणि एसटिव्ही नेटवर्कच्या सहकार्याने चित्रपटाच्या संगीताच्या रेकॉर्डिंगचा प्रवास फेब्रुवारी 2014 पासूनच सुरू केला होता. मुहूर्तापासून चित्रपटाच्या गाण्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून रसिकांना भुरळ पाडण्यासाठी चित्रपटाचे संगीत सज्ज झाले आहे.
प्रेमाची एक नवी व्याख्या बनू पाहणाऱ्या प्यार वाली लव्ह स्टोरी या चित्रपटाला अतिशय चपखल संगीत आणि शब्दांनी सजवले आहे. तीन हरहुन्नरी संगीतकारांनी चित्रपटाच्या संगीतात मैत्री, प्रेम अशा वेगवेगळ्या छटा आपल्या शैलीत रंगवल्या आहेत.
पंकज पडघन यांनी जरा जरा… या गाण्याला संगीत दिले असून वैभव जोशी यांनी शब्दबध्द केलेले हे गाणे जावेद अलीआणि सायली पंकज यांनी गायले असून, शटर का ताला… हे गाणं सचिन पाठक (यो) यांनी लिहीले असून अमितराजआणि रोहित राऊत यांनी गायले आहे.
अमितराज यांनी मंदार चोलकर लिहिलेले आणि जयदीप बागवडकर, आनंदी जोशी यांनी गायलेले बावरी… आणिजहां जाऊं तुझे पाऊं… हे गुरू ठाकूर लिहिलेले आणि दिव्या कुमार, आदर्श शिंदे आणि रॉनकिनी यांनी गायलेल्या दोन गाण्यांचे संगीतदिग्दर्शन केले आहे.
समीर साप्तीसकर यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या आली लहर… या सचिन पाठक (यो) यांनी लिहीलेल्या धम्माल गाण्यातअजित परब आणि सायली पंकज यांच्या बरोबरीने दिग्दर्शक संजय जाधव आणि नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनीही स्वर दिला आहे.
प्रकाशनावेळी दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले की, “चित्रपटाची गाणी ऐकल्यानंतर रसिकांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी कमालीचा उत्सुक आहे. दुनियादारीमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या आहेत, आणि त्या पूर्ण करायची जबाबदारी आमच्यावर आहे. माझ्या तीनही संगीतकारांनी आणि गायकांनी उत्तम काम केले आहे. इतर चित्रपट दिग्दर्शकांप्रमाणेच मला माझ्या आधीच्या चित्रपटाचे अर्थात दुनियादारीचे सर्व विक्रम मोडायचे आहेत. मैत्री आणि प्रेमाची एक नवीन गाथाच या संगीतातून निर्माण होईल अशी मी अपेक्षा करतो.”
चित्रपटाचे संगीत आणि पोस्टर प्रकाशन अनेक आश्चर्याचे धक्क्यांनी भरलेले होते. यावेळी प्यार वाली लव्ह स्टोरीची (पीव्हीएलएस) संपूर्ण टीम स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, ऊर्मिला कानेटकर-कोठारे, उपेंद्र लिमये, समीर धर्माधिकारी, चिन्मय मांडलेकर, नागेश भोसले आदी उपस्थित होते. त्याचबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनीही या सोहळ्याची रंगत वाढवली.
“मी या प्रकल्पाचा भाग होऊन खूपच आनंदी आहे. संजय जाधव आणि त्यांच्या टीमच्या कामाच्या दर्जावर आम्ही नेहमीच विश्वास ठेवून आहोत. चित्रपटाचे संगीत अतिशय उत्तम असून गेले काही आठवडे मी त्याचा आनंद घेत आहे, मला आशा आहे की प्रेक्षकही ही माझ्याप्रमाणे या संगीताची मजा लुटतील” असे चित्रपटाचे निर्माते एसटिव्हीचे कार्यकारी संचालकइंदर राज कपूर म्हणाले.
निर्मात्या आणि सिनेमा कंनपी इंडियाच्या संचालिका श्रीमती रेखा जयंत जोशी म्हणाल्या की, “चित्रपटातील प्रत्येकाने त्यांचा सर्वोत्कृष्ठ काम केले आहे, चित्रपटाचे संगीत अप्रतिम असून मला खात्री आहे की सर्व वयोगटांना ते भावेल. गेले काही महिने सातत्याने चित्रपटाच्या कामात व्यग्र असलेली ही टीम म्हणजे आता एक मोठे कुटुंबच आहे”.
चित्रपटाच्या सेटवर बारकाईने लक्ष ठेवून असलेले ड्रिमिंगट्वेंटीफोरसेव्हन 24×7चे दिपक पांडुरंग राणे म्हणाले की, “मी संजयदादा बरोबर प्यार वाली लव्ह स्टोरी आणि दुनियादारीच्या सेटवर काम केले आहे. हा चित्रपट पूर्ण करण्याचे शिवधनुष्य या टीमने कशा पध्दतीने पार पाडले आहे, हे मी जाणून आहे. चित्रपटाची संगीताची बाजू सांभाळणाऱ्या टीमने दिवसरात्र काम काम करुन अव्वल दर्जाची कलाकृती निर्माण केली आहे. या चित्रपटाचा एक भाग म्हणून काम करणे ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे.”
चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा संजय जाधव यांचे आहे, रेखा जयंत, इंदर राज कपूर आणि दीपक पांडुरंग राणे हे निर्माते आहेत. पटकथा अरविंद जगताप यांची असून तपन भट्ट आणि आशिष पाथारे हे सहलेखक आहेत. संवादआशिष पाथारे यांनी लिहीले आहेत. छायाचित्रदिग्दर्शन (डिओपी) प्रसाद भेंडे यांचे आहे तर, कला दिग्दर्शन सतीश चिपकर यांचे आहे. अपूर्वा मोतीवाल आणि आशिष म्हात्रे यांनी संकलन केले आहे. कौशल मोझेस यांनी साहस दृश्यांचे दिग्दर्शन केले आहे. उमेश जाधव यांनी नृत्यदिग्दर्शन केले असून वेशभूषा हर्षदा खानविलकर आणि रंगभूषासुभाष शिंदे यांची आहे.
संगीत प्रकाशनाचा हा सोहळा खरोखरीच या नव्या मोसमाची अनोखी सुरूवात होती, आणि चित्रपटसृष्टीसाठी अविस्मरणीय होता.
Pyaar-Vali-Love-Story-bollywood-update-1
PVLS-POSTER-bollywood-update
  • Views: 
  • 1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (No Ratings Yet)
    Loading...Loading...

Leave a Reply

You must be logged in to post a comment.